हेमाडपंथी मंदिर - खंडोबा (अणदूर उस्मानाबाद / सोलापूर)
Place ठिकाण
State : Maharastra महाराष्ट्र
District : Usmanabad (उस्मानाबाद )
Village : Andur (अणदूर)
मंदिराचे बांधकाम हे ११ व्या शतकातील हेमाडपंथी पद्धतीचे आहे. या मंदिरात खंडेराय यांच्यासहित इतर देव आणि देवी यांच्या दोन मुर्त्या आहेत.
This Mandir is one of the Hindu ancient Architecture style and it was developed in 11 century. Mandir is having statue of Shree bhagwan Khanderay and two other male and female god.
दर रविवारी मुख्य पूजेनंतर अन्नदानाचा कार्यक्रम होतो. या मंदिराची पूजा व देखरेख हे कित्तेक वर्षे गुरव समाज (मोकाशे) यांचे वारस करीत आहेत. श्री खंडेरायांना सोवळे, शेला पागोटी या वस्त्रांसहित मुख्यत्वेकरून खायच्या पान्यांचे आरास केलेले अलंकार घातले जातात.
Every Sunday after main pooja a food distribution program is conducted by Mandir. Hindu Gurav (Mokashe) families are doing pooja and managing this ancient Temple from many years.
प्रत्येक वर्षी मार्गशीर्ष महिन्यातील प्रतिपदेला अणदूर येथे छोटी यात्रा भरते. इतिहासाप्रमाणे नळदुर्ग इथे म्हाळसाईंच्या भक्तीने प्रस्सन होऊन श्री खंडेरायाचे अवतरण झाले होते. या यात्रेच्यावेळी नळदुर्गचे मानकरी लेखी करार करून श्री खंडेरायांना घेऊन जाण्यास येतात. हा करार पावणे दोन महिन्यांसाठी असतो. पौष पौर्णिमेनंतर नवमीच्या पूजेला अणदूरचे मानकरी श्री खंडेरायांना पुनः परत मंदिरात लेखी करार करून घेऊन जातात
यावेळी पौष पौर्णिमेला श्री खंडेरायांचा लग्न सोहळा थाटामाटात व भक्तिभावाने दरवर्षी पार पडला जातो. देवाला रोडगा भरीत (वांग्याचे भरीत), पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो.
सभोवतालीन प्रसिद्ध ठिकाणे :
Famous Places Near By
नळदुर्ग किल्ला - ५ कि.मी.
Naldurga Fort - 5 km.
मैलापुर (खंडेरायांच लग्न स्थळ) - ४ कि.मी.
Mailapur - 4 km.
तुळजापूर - ३० कि.मी.
Tuljapur - 30 Km.
अक्कलकोट - ३० कि.मी.
Akkalkot - 30 km.
गाणगापूर - ४० कि.मी.
Gangapur - 40 km.
अणदूर हे सोलापूरपासून ३५ कि.मी.
Andur is at 35 km from Solapur smart city
0 Komentar